E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
शैक्षणिक
यूपीएससीतर्फे विविध परीक्षांचे वेळापत्रक जाहीर
Wrutuja pandharpure
18 May 2025
पुणे
: केंद्रीय लोकसेवा आयोगाने (यूपीएससी) २०२६ मध्ये होणार्या स्पर्धा परीक्षांचे वेळापत्रक प्रसिद्ध केले आहे. त्यानुसार नागरी सेवा परीक्षेतील पूर्वपरीक्षा २४ मे रोजी, तर मुख्य परीक्षा २१ ऑगस्ट रोजी होणार आहे.
‘यूपीएससी’तर्फे केंद्रीय स्तरावरील पदभरतीसाठीच्या विविध परीक्षा आयोजित करण्यात येतात. त्यात नागरी सेवा, अभियांत्रिकी सेवा, एनडीए भरती, वनसेवा अशा विविध परीक्षांचा समावेश आहे. देशभरातील लाखो उमेदवार या परीक्षा देतात. वार्षिक वेळापत्रक जाहीर करण्यात आल्यामुळे वेळापत्रकानुसार उमेदवारांना परीक्षांची तयारी करणे शक्य होणार आहे.
‘यूपीएससी’ने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार, राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिका (एनडीए) आणि कम्बाइन्ड डिफेन्स स्टाफ (सीडीएस) यांच्या प्रथम परीक्षेची अधिसूचना १० डिसेंबर २०२५ रोजी प्रसिद्ध होऊन लेखी परीक्षा १२ एप्रिल २०२६ रोजी घेतली जाणार आहे. द्वितीय परीक्षेची अधिसूचना २० मे २०२६ रोजी प्रसिद्ध करून १३ सप्टेंबर २०२६ रोजी परीक्षा घेतली जाणार आहे. संयुक्त भू-वैज्ञानिक परीक्षेची अधिसूचना ३ सप्टेंबर रोजी, तर पूर्वपरीक्षा ८ फेब्रुवारी २०२६ रोजी, मुख्य परीक्षा २० जून २०२६ रोजी घेतली जाणार आहे.
अभियांत्रिकी सेवा परीक्षेची अधिसूचना १७ सप्टेंबर रोजी प्रसिद्ध होऊन ८ फेब्रुवारी २०२६ रोजी पूर्वपरीक्षा, तर मुख्य परीक्षा २१ जून रोजी घेण्याचे नियोजन आहे. संयुक्त वैद्यकीय सेवा परीक्षेची अधिसूचना ११ मार्च २०२६ रोजी प्रसिद्ध करण्यात येणार असून, परीक्षा २ ऑगस्ट २०२६ रोजी घेतली जाणार आहे. भारतीय वन सेवेची पूर्वपरीक्षा २४ मे रोजी, मुख्य परीक्षा २२ नोव्हेंबर २०२६ रोजी घेतली जाणार आहे.सेंट्रल आर्म्ड पोलीस फोर्सेस परीक्षेची अधिसूचना १८ फेब्रुवारी २०२६ रोजी प्रसिद्ध केली जाणार आहे, तर १९ जुलै २०२६ रोजी परीक्षा होणार आहे. ‘यूपीएससी’तर्फे घेतल्या जाणार्या सर्व परीक्षांचे सविस्तर वेळापत्रक upsc.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
Related
Articles
महापालिकेच्या जलतरण तलावाच्या खासगीकरणाचा सपाटा
05 Jun 2025
भारताचा महिला आंतरराष्ट्रीय कृषी हॅकेथॉन १ जूनपासून पुण्यात
30 May 2025
आळंदीजवळील कत्तलखान्याचे आरक्षण वगळणार : उदय सामंत
05 Jun 2025
वारीसाठी पुण्यातून नवीन लालपरी
05 Jun 2025
शहरातील नाल्यांवरच अतिक्रमण
04 Jun 2025
मार्केटयार्डात कचर्याची दुर्गंधी
30 May 2025
महापालिकेच्या जलतरण तलावाच्या खासगीकरणाचा सपाटा
05 Jun 2025
भारताचा महिला आंतरराष्ट्रीय कृषी हॅकेथॉन १ जूनपासून पुण्यात
30 May 2025
आळंदीजवळील कत्तलखान्याचे आरक्षण वगळणार : उदय सामंत
05 Jun 2025
वारीसाठी पुण्यातून नवीन लालपरी
05 Jun 2025
शहरातील नाल्यांवरच अतिक्रमण
04 Jun 2025
मार्केटयार्डात कचर्याची दुर्गंधी
30 May 2025
महापालिकेच्या जलतरण तलावाच्या खासगीकरणाचा सपाटा
05 Jun 2025
भारताचा महिला आंतरराष्ट्रीय कृषी हॅकेथॉन १ जूनपासून पुण्यात
30 May 2025
आळंदीजवळील कत्तलखान्याचे आरक्षण वगळणार : उदय सामंत
05 Jun 2025
वारीसाठी पुण्यातून नवीन लालपरी
05 Jun 2025
शहरातील नाल्यांवरच अतिक्रमण
04 Jun 2025
मार्केटयार्डात कचर्याची दुर्गंधी
30 May 2025
महापालिकेच्या जलतरण तलावाच्या खासगीकरणाचा सपाटा
05 Jun 2025
भारताचा महिला आंतरराष्ट्रीय कृषी हॅकेथॉन १ जूनपासून पुण्यात
30 May 2025
आळंदीजवळील कत्तलखान्याचे आरक्षण वगळणार : उदय सामंत
05 Jun 2025
वारीसाठी पुण्यातून नवीन लालपरी
05 Jun 2025
शहरातील नाल्यांवरच अतिक्रमण
04 Jun 2025
मार्केटयार्डात कचर्याची दुर्गंधी
30 May 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
तुर्कस्तानला दणका
2
आठवडाभरापासून मान्सून स्थिर
3
एनडीएत नवा अध्याय
4
वाचक लिहितात
5
पती आणि सासू येरवडा कारागृहात
6
मार्केटयार्डात कचर्याची दुर्गंधी